By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company’s Terms & Conditions and Privacy Policy.
Maharashtra Board HSC Result 2025 Declared LIVE at TV9 Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालाची उत्सुकता राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक आहे. विद्यार्थी त्यांचा इयत्ता बारावीचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने mahresult.nic.in या वेबसाईटचा समावेश आहे. निकालाच्या प्रत्येक अपडेटसाठी तसेच निकालाची थेट माहिती, आकडेवारी यासाठी आमच्या लाईव्ह ब्लॉगला फॉलो करा.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास, किती टक्के मिळाले?https://t.co/QpwYPN0rou #HSCResult
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2025
बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. सर्वात आधी विद्यार्थ्यांना टीव्ही ९ मराठीवर पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स कराव्या लागणार आहेत.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
1) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
3) https://mahahsscboard.in
4) http://hscresult.mkcl.org
बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. अवघ्या १० मिनिटात विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थी, पालक हे निकाल पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
१९२९ कनिष्ठ महाविद्यालये त्यांचा निकाल १०० टक्के लागला. यात ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेले कॉलेज ४ हजार ५६२ आहे. तर शून्य टक्के निकाल लागलेले कॉलेज ३८ आहेत. एकूण १० हजार ४९६ कॉलेजातून विद्यार्थी बसले होते. २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे मार्क मिळाले आहेत. तृतीयपंथी १८ विद्यार्थी बसले होते. लातूर पॅटर्न म्हणजे काही विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात. याचा अर्थ असा नाही की सर्वच विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात. त्यांची गुणवत्ता चांगली असू शकते. पण त्यांचा निकाल सर्वात शेवटचा आहे.
विज्ञान शाखा
कला शाखा
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.८८ टक्के
निकालाची सरासरी नेहमीप्रमाणे आहे. दरवर्षी निकाल कमी जास्त झाला आहे.
१९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ३८ कॉलेजचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
यंदा बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे.
२०२२- ९४.२२ २०२३- ९१.२५ २०२४ – ९३.३७ २०२५ – ९१.८८ मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे
यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून ४२ हजार ३८८ रिपीटरने नोंदणी केली. ४२ हजार २४ बसले. यापैकी १५ हजार ८२३ पास झाले. एकूण उत्तीर्ण ३७.५४ टक्के निकाल लागला आहे. ७ हजार ३१० दिव्यांग विद्यार्थी नोंदणी. ७ हजार २५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. ६ हजार ७०५ पास झाले. निकाल टक्केवारी ९२.३८ टक्के इतकी आहे.
HSC Result 2025 Maharashtra Board LIVE : आज बारावीचा निकाल जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर करत आहेत.
गेल्यावर्षी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या अभ्यासक्रमाच्या एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे एकूण उत्तीर्णांची टक्केवारी 93.37 टक्के इतकी नोंदवण्यात आली होती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळात राज्यभर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली होती.
गेल्यावर्षी बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली होती. यात 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
आज बारावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने, नागपूर विभागातून परीक्षा दिलेल्या १ लाख ५८ हजार ५३७ विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, परीक्षा लवकर झाल्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत किमान १५ दिवस आधी निकाल जाहीर होत आहे. नागपूर विभागात सर्वाधिक विद्यार्थी संख्या नागपूर जिल्ह्यातील आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.
गेल्यावर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला होता. २०२४ च्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली होती. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला होता. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग सर्वात शेवटी होता.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
1) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
3) https://mahahsscboard.in
4) http://hscresult.mkcl.org
Maharashtra Board 12th Result 2025 Update : पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध होतील. राज्यातील सुमारे १५ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
आज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
Published On – May 05,2025 7:21 AM
Maharashtra Board HSC Result 2025 LIVE at TV9: बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, सर्वात आधी ‘टीव्ही 9… – TV9 Marathi
