महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका! शिवसेना लॉटरी विव्रेता सेना, लॉटरी बचाव कृती समितीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी – Saamana (सामना)

महाराष्ट्र राज्य लॉटरीवर लाखो पुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. इतर राज्यांमध्ये लॉटरी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होत असताना आपल्याकडे पारदर्शकपणे सोडत होऊनही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लॉटरी विव्रेता सेना आणि लॉटरी बचाव पृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात शिवसेना लॉटरी विव्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक आणि आमदार सुनील शिंदे, लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार, अपर मुख्य सचिव वित्त विभाग ओमप्रकाश गुप्ता, शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग, सरचिटणीस सिद्धेश पाटील, खजिनदार अविनाश सावंत, सदस्य संतोष तोडणकर, विश्वजीत मयेकर, लॉटरी बचाव कृती समिती सदस्य चंद्रकात मोरे, स्नेहलकुमार शाह, गणेश कदम, विलास सातार्डेकर, दिलीप धुरी उपस्थित होते.
अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीबाबतची सद्यस्थिती उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली. दरम्यान, या लॉटरी विक्रीवर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *