मोठी घोषणा; पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार – ETV Bharat

महाराष्ट्र
maharashtra
ETV Bharat / state
By ETV Bharat Marathi Team
Published : April 29, 2025 at 10:44 AM IST
मुंबई: मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच निघणार आहे. यामुळं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर पुढील पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार असल्याची माहिती, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
पुनर्विकासासाठी जास्त वेळ लावू नका: पुनर्विकासासाठी तब्बल 30, 35 वर्षे लागणं अत्यंत चुकीचं आहे. पुनर्विकासाची कामे तातडीनं आणि प्राधान्यानं करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. तर पुनर्विकासासाठी जास्त वर्षे लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटतं, असं जयस्वाल म्हणाले. म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद आणि गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, जितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक उपस्थित होते.

मोठी गुंतवणूक होणार : संजीव जयस्वाल म्हणाले, “एमएमआर रिजनमध्ये 2 लाख 49 घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत 5 लाख 32 हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड आणि कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई आणि एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब आणि गृहनिर्माण धोरणाबाबत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल यांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार आहे”.
‘या’ ठिकाणी पुनर्विकास केला जाणार: मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलिस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिध्दार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणूकदार आणि म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल.

काय आहेत शिफारसी? : रेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचं उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बॅक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाडेतत्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबईसाठी अतिरिक्त 0.5 एफएसआय आणि एमएमआर रिजनसाठी 0.3 एफएसआय देण्यात येईल. रेंटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च 50 टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टैक्स 50 टक्के केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत.

रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा : “मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बेंगलोर हैद्राबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचं मत निरंजन हिरानंद यांनी मांडलं. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मेट्रो कामांना वेग देण्याची गरज आहे. प्रकल्पांना विलंब झाल्यानं त्याचा फटका बसत असल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं. सरकार जी आश्वासने देते ती पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रेंटल धोरण अस्तित्वात आल्यास ती देशातील हाऊसिंग क्षेत्रातील क्रांती ठरेल”, असं हिरानंदानी म्हणाले.

प्रकल्पांची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करणार : मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. या प्रकल्पांची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल यांनी आजची ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण परिषद असल्याचं मत व्यक्त केलं. क्लस्टरसाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा –

  1. सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! वर्षभरात म्हाडा बांधणार 19497 सदनिका, मुंबईत ‘इतक्या’ घरांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट!
  2. मायानगरीत घ्या घर! म्हाडा मुंबई मंडळाकडून 2030 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर – mhada lottery mumbai 2024
  3. म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ – Pune Mhada Lottery

मुंबई: मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच निघणार आहे. यामुळं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर पुढील पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार असल्याची माहिती, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
पुनर्विकासासाठी जास्त वेळ लावू नका: पुनर्विकासासाठी तब्बल 30, 35 वर्षे लागणं अत्यंत चुकीचं आहे. पुनर्विकासाची कामे तातडीनं आणि प्राधान्यानं करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. तर पुनर्विकासासाठी जास्त वर्षे लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटतं, असं जयस्वाल म्हणाले. म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद आणि गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, जितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक उपस्थित होते.

मोठी गुंतवणूक होणार : संजीव जयस्वाल म्हणाले, “एमएमआर रिजनमध्ये 2 लाख 49 घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत 5 लाख 32 हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड आणि कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई आणि एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब आणि गृहनिर्माण धोरणाबाबत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल यांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार आहे”.
‘या’ ठिकाणी पुनर्विकास केला जाणार: मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलिस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिध्दार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणूकदार आणि म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल.

काय आहेत शिफारसी? : रेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचं उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बॅक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाडेतत्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबईसाठी अतिरिक्त 0.5 एफएसआय आणि एमएमआर रिजनसाठी 0.3 एफएसआय देण्यात येईल. रेंटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च 50 टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टैक्स 50 टक्के केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत.

रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा : “मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बेंगलोर हैद्राबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचं मत निरंजन हिरानंद यांनी मांडलं. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मेट्रो कामांना वेग देण्याची गरज आहे. प्रकल्पांना विलंब झाल्यानं त्याचा फटका बसत असल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं. सरकार जी आश्वासने देते ती पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रेंटल धोरण अस्तित्वात आल्यास ती देशातील हाऊसिंग क्षेत्रातील क्रांती ठरेल”, असं हिरानंदानी म्हणाले.

प्रकल्पांची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करणार : मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. या प्रकल्पांची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल यांनी आजची ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण परिषद असल्याचं मत व्यक्त केलं. क्लस्टरसाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा –
For All Latest Updates
TAGGED:
काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ, वाचा पंचांग
आज चंद्र धनु राशीत;’या’ राशींच्या लोकांची सर्व कामे आज सुरळीत पार पडतील, वाचा राशीभविष्य
‘एआय’द्वारे कराडमधील महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ का बनवले? धक्कादायक कारण आलं समोर
सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेश द्वारावरील भिंत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू, पाच लाखांची मदत जाहीर
आषाढी यात्रेसाठी ‘लालपरी’ सज्ज! वारकऱ्यांना ‘गाव ते पंढरपूर’ बस सेवा मिळणार, जाणून घ्या नियोजन
न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती प्रभावी होऊ शकेल काय?
राज्यातील पहिलं ‘क्यू आर कोड वाचनालय’, स्कॅन करा अन् वाचा महसूल विभागाशी संबधित पुस्तकं
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी : माथेफिरुनं मुख्यमंत्र्यांच्या जातीचाही केला उल्लेख
WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर, 180 धावा काढुनही RCB चा घरात पराभव
Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *